Weather Agrowon
हवामान

Weather Update : कार्तिक पौर्णिमेदरम्यान तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण व थंडीला विराम

Maharashtra Weather : सध्याच्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी काहीशा वाढत्या थंडीला, फक्त ह्या तीन दिवसासाठी विराम मिळेल, असा अंदाज खुळे यांनी दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दि.१४ ते १७ नोव्हेंबरला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

सध्याच्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी काहीशा  वाढत्या थंडीला, फक्त ह्या तीन दिवसासाठी विराम मिळेल, असा अंदाज खुळे यांनी दिला आहे. सध्या जाणवणारा हा वातावरणीय परिणाम विशेषकरून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर ह्या जिल्ह्यातच अधिक जाणवेल.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक ह्या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही. रविवारी म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून पुन्हा थंडीसाठी स्थिती पूर्ववत होईल, अशी शक्यता खुळे यांनी वर्तवली आहे.

तसेच पुढील आठवडाभर महाराष्ट्रात दुपारचे कमाल आणि पहाटेचे किमान असे दोन्हीही तापमाने सरासरी इतके राहून कमाल तापमान हे ३१ तर किमान तापमान हे १५ ते १७ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान राहील.

तर पुढील आठवडाभर म्हणजे २० नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळसाठीची कोणत्याही वातावरणीय प्रक्रियेची शक्यता नाही, असं हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT