Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र 'ऑरेंज अलर्ट'

Latest Rain Update : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी येत आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, विदर्भातही पावसाने जोर धरला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी येत आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, विदर्भातही पावसाने जोर धरला आहे.

आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उकाडा मात्र कायम आहे. चाळीशीपार गेलेले तापमान बहुतांश ठिकाणी ३३ अंशांच्याही खाली घसरले आहे.

मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २५ ते ३६ अंशाच्या दरम्यान होते.

उत्तर छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्य राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा विस्तारला आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे कायम असून, दक्षिण गुजरात पासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २८) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनने बहुतांश देश व्यापला

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशीराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. मंगळवारी (ता. २७) उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गुजरातसह राजस्थान आणखी काही भागात प्रगती केली. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने, संपूर्ण हरियाणा, पंजाबसह राजस्थानच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा,

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद

Annasaheb Hazare Social Awards: राळेगणसिद्धीत १५ जून रोजी अण्णासाहेब हजारे पुरस्कार

SCROLL FOR NEXT