Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत असल्याने आजपासून (ता. १) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत असल्याने आजपासून (ता. १) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्र लगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, दिल्ली, हरदोई, देहरी, पुरूलिया, सागर बेट ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे.

दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह राज्यात असलेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे.

बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे उच्चांकी ३४० मिलिमीटर, शिरगाव येथे २२६ मिलिमीटर, तर दावडी येथे २०८ मिलिमीटर पाऊस झाला. कोकणासह, घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भात मॉन्सून सक्रिय होण्याची होत असून, आज (ता. १) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्हे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT