Hailstorm Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : पुण्यात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’

Weather Update : उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज (ता. ११) पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येत असून, शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, संभाजीनगर, नांदेड, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यांत हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस आणि मालेगाव, सोलापूर, धुळे येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी होत आहे.

आग्नेय अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत, मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.३, धुळे ४२, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्‍वर ३१.८, मालेगाव ४२.४, नाशिक ३७.४, निफाड ३८, सांगली ४०, सातारा ३९.२, सोलापूर ४२.२, सांताक्रूझ ३३.७, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३३.६,

छत्रपती संभाजीनगर ३८.४, नांदेड ४०.२, परभणी ४१, अकोला ४३.२, अमरावती ३९.२, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ३२.६, चंद्रपूर ३८, गडचिरोली ३५, गोंदिया २९.६, नागपूर ३२.७, वर्धा ३५.६, वाशीम ४१.२, यवतमाळ ३९.

वादळी, गारपिटीचा पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट) :

पुणे.

वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३.२, मालेगाव ४२.४, सोलापूर ४२.२, धुळे ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT