Monsoon agrowon
हवामान

Monsoon 2023: कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

Team Agrowon

latest weather update : राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने शेतशिवार झोडपून काढली. हवामान विभागाने आजही राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

कालपासून राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. काल सायंकाळी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी जोरदार सरी झाल्या. आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर बहुतांशी ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील अनेक भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला.  कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. हा कमी दाबाचा पट्टा बिकानेर, नरनौल, शिवपुरी, मांडला, अंबिकापूर, चंडबाली आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आहे. चक्राकार वाऱ्याची स्थिती बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि ओडिशाच्या किनारी भागात आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर असून दक्षिणेकडे झुकलेली आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात आग्नेय दिशेला कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

सध्याची स्थिती राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्यास अनुकूल आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांशी भागात हवामान विभागाने आज हलका, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hailstorm: राज्यात आज, उद्या गारपीटीचा अंदाज; पुढील ३ दिवस राज्यभरात वादळी पावसाला पोषक हवामान

Saklai Irrigation Project: साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करा

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आणखी ४३ कोटींचा निधी मंजूर

Mega International Agri Market: ‘वाढवण’मध्ये बाराशे एकरांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उभारणी

Banana Crop Management: केळी बागेच्या अवस्थेनुसार व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT