Rahul Gandhi Amit Shah Defamation Case: उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यातील एका विशेष एमपी/एमएलए न्यायालयाने आज (दि. २६ ऑक्टोबर) लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात निर्दोष ठरवले. २०१८ मध्ये तत्कालीन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात कथित मानहानिकारक वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. पण या प्रकरणी राहुल गांधींना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. .या खटल्याचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शुभम वर्मा यांनी निकाल सुनावला. यावेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात हजर होते. भाजप नेते विजय मिश्रा यांनी या प्रकरणी खटला दाखल केला होता. कर्नाटकातील बंगळूर येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शहा त्यावेळी भाजपचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर हत्येचा आरोप असल्याचा दावा राहुल यांनी केला होता. .Rahul Gandhi: राजधानी दिल्लीला तुरुंग का बनवलं? ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत? राहुल गांधींचा सवाल .या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले. या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर दुसरीकडे तक्रारदाराने दावा केला की, त्यांची वक्तव्ये मानहानीकारक होती. त्यावर न्यायालयाने, राहुल यांनी केलेली वक्तव्ये मानहानीकारक नसल्याचे स्पष्ट केले..Rahul Gandhi Assets Case: बेहिशेबी संपत्ती प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा आदेश.''भाजपच्या अध्यक्षांवर हत्येचा आरोप आहे. हेच खरे सत्य आहे. ज्या पक्षाकडून प्रामाणिकपणा आणि सभ्यतेच्या गोष्टी केल्या जातात; त्या पक्षाच्या अध्यक्षांवर हत्येचा आरोप आहे,'' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीदरम्यान केले होते. त्यांनी सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाचा उल्लेख केला होता. यातून २०१४ मध्ये एका विशेष सीबीआय न्यायालयाने शहा यांना आरोपमुक्त केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.