Kolhapur Rain Update : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत समाधानकारक पाऊस झाला. घाटमाथ्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने काही काळ धुवाँधार बॅटींग केली. होत असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दुसर्यांदा पाण्याखाली गेला आहे. याचबरोबर आतापर्यंत पंचगंगा नदीवरील ४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे कालपासून जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असला, तरी जोरदार कोसळणार्या सरींमुळे नद्या, नाले, तलावांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
मागच्या २४ तासात होणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अवघ्या ८ तासांत तब्बल दिड फुटांनी पाणी पातळी वाढली होती. यामुळे दुपारी तीनच्या सुमारास पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.
दरम्यान कोणतीही अनुचीत प्रकार घडून यासाठी पोलिसांनी बॅरेकेडिंग लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली. दरम्यान सकाळपर्यंत राजारामबंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटांवर आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत चार धरणांमध्ये अतिवृष्टी झाली. राधानगरीत ७८ मि.मी., पाटगावात ८० मि.मी., घटप्रभा परिसरात ११० मि.मी., तर कोदे परिसरात ६८ मि.मी. पाऊस झाला.
काल एका दिवसांत राधानगरी धरणात ४.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दूधगंगा धरणाचा पाणीसाठा ५.४१ टीएमसीवर गेला असून, धरण २१ टक्के भरले आहे.
मागच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ३५.१. भुदरगडमध्ये २६.३मि.मी., तर गगनबावड्यात २४ मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत १७.५, शाहूवाडीत १५.१, करवीर आणि आजरा तालुक्यांत प्रत्येकी १०.१, गडहिंग्लजमध्ये ७.२, पन्हाळा परिसरात ७, हातकणंगलेत २.४, तर सर्वात कमी शिरोळ तालुक्यात १.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.