Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon : मॉन्सूननं आणखी काही भागातून घेतली माघार; तीन जिल्ह्यांना पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Monsoon rain : सोमवारी २५ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनची वाटचाल काहीशी रखडली होती. पण आता मॉन्सूननं शनिवारी राजस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं.

Dhananjay Sanap

Monsoon update : सोमवारी २५ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनची वाटचाल काहीशी रखडली होती. पण आता मॉन्सूननं शनिवारी राजस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं. 

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. आज कोंकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज सकाळी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.   

आज मराठवाड्यातील परभणी,बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी  जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

रविवारी विदर्भ, मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT