Monsoon Rain  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

Monsoon Rain Update : पश्‍चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाचा मुहूर्त लांबला आहे. मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत असल्याने सोमवारी (ता. २३) पश्‍चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. गतवर्षी २५ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातमधून परतीचा प्रवासाला सुरुवात केली होती.

वायव्य भारतात मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होऊ लागले असून, तेथे कोरड्या हवामानासह बाष्पाचे प्रमाणकमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत (ता. २३) राजस्थान आणि कच्छमधून मॉन्सून मुक्काम हलविण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT