Monsoon  Agrowon
हवामान

North East Monsoon Withdrawn: ईशान्य मान्सूनचा देशातून काढता पाय; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता

Rain Forecast : दक्षिणेत १५ ऑक्टोबरला स्थिरावलेला ईशान्य माॅन्सून अखेर देशातून निघून गेला. तर राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.

अनिल जाधव

Pune News : दक्षिणेत १५ ऑक्टोबरला स्थिरावलेला ईशान्य माॅन्सून अखेर देशातून निघून गेला. तर राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह अगदी किरकोळ पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

नैऋत्य माॅन्सूनचे देशात ३० मे २०२४ ला आगमन झाले होते तर १५ ऑक्टोबरला नैऋत्य माॅन्सूनने देशाचा निरोप घेतला. त्याच दिवसापासून ईशान्य माॅन्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यांमध्ये स्थिरावला होता. अखेर सोमवारी (ता.२७) ईशान्य माॅन्सूनने देशातून काढता पाय घेतला.

श्री. खुळे म्हणाले की, गेल्या १० दिवसांपासून किमान तापमानातील चढ उतारासहित दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यांमध्ये माफकच थंडी जाणवली. तर कोकण, खानदेश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर अशा १३ जिल्ह्यांत मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही.

पुढील १० ते १२ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होवून थंडी अजून कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली, असे समजू नये.

सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील आठवड्यात २ ते ३ दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असाही अंदाज व्यक्त करत खुळे म्हणाले की, त्यात शनिवारी (ता. १ फेब्रुवारी) लातूर नांदेड बीड सोलापूर जिल्ह्यात, रविवारी (ता.२) कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली, वाशिम आणि बुधवारी (ता.५) लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे.

श्री. खुळे पुढे म्हणाले की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे. शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात आहे. त्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे.

हेच प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेव्हा बंगालच्या उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेमुळे व वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वर दिलेल्या जिल्ह्यांमध्ये १, २ आणि ५ फेब्रुवारीला ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असाही असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT