Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज

राज्यात सुरू असलेला वादळी पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात सुरू असलेला वादळी पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उर्वरीत राज्यात पावसाने मुख्यतः उघडीप दिल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस, तर धुळे येथे ३८ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे.

उत्तर तामीळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच आग्नेय राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.५ (२१.८), जळगाव ३६.७ (२४.०), धुळे ३८.० (२२.४), कोल्हापूर ३४.८ (२२.०), महाबळेश्वर २८.१ (१६.१), नाशिक ३३.३ (२१.७),

निफाड ३५.६ (२१.५), सांगली ३५.८ (२२.१), सातारा ३५.३ (२१.५), सोलापूर ३८.२ (२५.७), सांताक्रूझ ३२.७ (२६.०), डहाणू ३३.६ (२६.५), रत्नागिरी ३३.९ (२४.७),

छत्रपती संभाजीनगर ३३.५ (२२.२), नांदेड ३३.८ (२३.०), परभणी ३४.० (२३.१), अकोला ३५.७ (२४.१), अमरावती ३४.८(२१.८), बुलढाणा ३३.० (२३.२), ब्रह्मपूरी ३५.२ (२४.१),

गडचिरोली ३४.०(२४.०), गोंदिया ३५.० (२२.४), नागपूर ३५.२ (२३.४), वर्धा ३५.०(२४.२), वाशीम ३२.२ (२३.०), यवतमाळ ३४.५ (२३.०).

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग.

मध्य महाराष्ट्र, : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात शनिवारी (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात उद्यापर्यंत (ता. ८) कमी दाबाचे क्षेत्राचे, तसेच प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT