Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : थांबलेल्या मॉन्सूनची पूर्व विदर्भात प्रगती

Monsoon Rain : मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) पूर्व विदर्भात चाल करत अमरावती आणि गोंदियापर्यंत मजल मारली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) तब्बल आठवडाभरापासून थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) पूर्व विदर्भात चाल करत अमरावती आणि गोंदियापर्यंत मजल मारली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने दोन ते तीन दिवसांत मॉन्सूनची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे.

यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने सुरू झाला. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर ६ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झाले.

मजल-दरमजल वाटचाल करणारा मॉन्सून १२ जून रोजी पश्चिम विदर्भाच्या काही भागात पोचला. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल मंदावली होती. बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण असतानाच, अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थबकली होती.

गुरुवारी (ता. २०) मॉन्सूनने पूर्व विदर्भात चाल करताना अमरावती, गोंदियापर्यंत मजल मारली. तर छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करणाऱ्या मॉन्सूनने तब्बल २० दिवसांनी पूर्व भारतात वाटचाल केली आहे.

बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि बिहारच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

दोन दिवसांत गुजरात, मध्यप्रदेशकडे आगेकूच

दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT