Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain: माॅन्सूनचा प्रवास आजही खोळंबला; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहण्याची शक्यता

Monsoon Rain Alert: माॅन्सूनची प्रगती आजही ठप्प आहे आणि राज्यात पावसाचा जोर कमी होत आहे. पुढील ५ दिवस विदर्भ भागातच जोरदार पावसाची शक्यता आहे, तर इतर भागांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. माॅन्सून दोन दिवस एकाच भागात मुक्कावर होता. तर राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र पुढील ५ पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज प्रगती केली नाही, त्यामुळे माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. मात्र माॅन्सून पुढील २ दिवसांत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.राज्यातील अनेक भागात हलक्या सरी झाल्या तर काही भागात पावसाची उघडीप होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील ५ दिवस विदर्भ वगळता पाऊस कमीच राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आळा. पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे.

तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातही पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT