Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon News : मॉन्सूननं घेतली आणखी काही भागातून माघार; पाच जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'

Monsoon Return : हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर मंगळवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांना वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Monsoon Back : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. काल राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर बहुतांश भागात मुख्यत: उघडीप पाहायला मिळाली. आज राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण होतं.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर मंगळवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांना वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मंगळवारी विदर्भातील भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या पाच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या हजेरी लावतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी मॉन्सूननं उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह उर्वरित राजस्थान आणि गुजरातच्याअ काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं. मॉन्सूनच्या परतीच्या सीमा आज गुलमार्ग, धरमशाला, मुक्तेश्वर, पीलीभीट, ओराई, अशोकनगर, इंदोर, बडोदा, पोरबंदर भागात आहे.

(Weather News)

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असल्यानं मॉन्सून जम्मू, काश्मीर, लदाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुज्जफराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात राज्याच्या उर्वरित भागातून माघार घेईल. तर पुढील २ ते ३ दिवसांत पूर्व उत्तराखंड, पूर्व मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT