Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon : मॉन्सून आज केरळात दाखल होणार

Weather Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीस वेग आला आहे. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार केरळमध्ये आज (ता. ३०) मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीस वेग आला आहे. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार केरळमध्ये आज (ता. ३०) मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाकडे आणि पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ रोजी मॉन्सूनचे आगमन झाले. त्यानंतर श्रीलंकेच्या बहुतांश भागासह अंदमान बेट समूह मॉन्सूनने व्यापला. यात दरम्यान उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने रविवारी (ता. २६) मॉन्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात प्रगती केली.

दुसरीकडे अरबी समुद्रातून २४ पासून थबकलेली वाटचाल सुरू करत मॉन्सूनने मंगळवारी (ता. २८) अरबी समुद्रातून चाल केली. मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सून ३१ पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे. आता आज (ता. ३०) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.

आगमनाच्या दीर्घकालीन वेळ पाहता १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मॉन्सूनचे आगमन ७ दिवस मागे पुढे होऊ शकते. यंदा दोन दिवस आधी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटे आणि बंगालचा उपसागर आणि पूर्वोत्तर राज्यातही मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT