Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सून केरळमध्ये चार दिवसांत येणार

Monsoon Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागरातून प्रवास सुरू ठेवला. संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापल्यानंतर नैॡत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागरातून प्रवास सुरू ठेवला. संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापल्यानंतर नैॡत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे.

आता अरबी समुद्रातून मॉन्सूनच्या प्रगतीला सुरुवात होण्याची चिन्हे आहे. पुढील चार दिवसांत मॉन्सून केरळसह अरबी समुद्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमुह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे मॉन्सूनचे आगमन झाले. त्यानंतर मजल- दरमजल करत मॉन्सूनचा प्रवास सुरू आहे. उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल भेटल्याने रविवारी (ता. २६) मॉन्सूनने बंगालच्या उपसागराचा बहुतांशी भाग व्यापला.

दरम्यान, अरबी समुद्रातूनही मॉन्सूनने वाटचाल केली असून, मालदीवसह श्रीलंकेच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल झाला आहे. मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.

आता अरबी समुद्रात मॉन्सूनसाठी पोषक हवामान झाल्याने पुढील चार दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान संपूर्ण मालदीव व्यापून अरबी समुद्राच्या आणखी काही भाग, पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Recovery: शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा लावू नका, बावनकुळेंचा बँकांसह मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

Agrowon Podcast: सोयाबीनचे भाव तेजीत, कांद्याच्या दरात चढ-उतार, टोमॅटो दरात नरमाई, मेथीच्या बाजारात बदल, रताळ्याच्या दरात घसरण

Swabhimani Shetkari Sanghatana Demands: कारखानदार ‘स्वाभिमानी’ची मागणी मान्य करणार का?

Mango Orchard Management: दुष्काळी वातावरणातील आंबा बागेचे व्यवस्थापन

Pre Season Cotton Picking: पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणीस गती

SCROLL FOR NEXT