Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

Weather Update In Maharashtra : अरबी समुद्रातील 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे.

Team Agrowon

Cyclone Update : अरबी समुद्रातील 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे.

गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, कर्नाटक मधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मॉन्सूनने गुरूवारी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तामिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली.

तर १० जून रोजी मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनम पर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वाऱ्यांच्या प्रगतीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत मध्य अरबी समुद्र कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूचया आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT