Monsoon Forecast 
हवामान

Monsoon : मॉन्सून परतीचा प्रवास अडखळला ; राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

monsoon rain return : हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह खानदेशातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे.

Dhananjay Sanap

Monsoon back : राज्यात पावसाला पोषक स्थिती असल्यामुळे अनेक भागात मागील चार दिवसापासून पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहे. हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह खानदेशातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे.

गुरुवारी संध्याकाळी राज्यात विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्हयात काही ठिकाणी वीजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला. तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापुर, जिल्हयासह सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोमवारी मॉन्सून परतीचा प्रवास सुरू केल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं. परंतु मागील चार दिवसांपासून मॉन्सून परतीची सीमा जैसे थे आहे. मॉन्सूननं राजस्थानमधील नौखरा, जोधपूर, बारमेर भागातून माघार घेतली आहे. दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तर दुसरे कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य उपसागरावर आहे. त्यामुळे आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता आहे. तर रविवारपासून पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT