Monsoon Agrowon
हवामान

Monsoon : देशातून मॉन्सून परतला...

Team Agrowon

माणिकराव खुळे

Maharashtra Weather : राज्यात १४ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता. मंगळवारपासून मॉन्सूनने महाराष्ट्र, सीमावर्ती मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओडिशा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यांतून परतला आहे. थोडक्यात परतीचा पाऊस हा एका दिवसासाठी महाराष्ट्राला स्पर्श करून गेला असेच म्हणावे लागेल.

दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, पुद्दूचेरी, काराईकल, तमिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील भागांत गेल्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरातून बळकट वेगवान पूर्वीय वाऱ्यांच्या वातावरणीय प्रणालीतून तेथे पूर्व ईशान्य मोसमी पाऊस होत होता. या प्रणालीच्या रेट्यातून महाराष्ट्र, सीमावर्ती मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओडिशा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकसहित देशातूनच मंगळवारी मॉन्सून माघारी परतला.

जून ते सप्टेंबर या दरम्यान मोसमी पावसाने १३९ दिवसांनंतर, म्हणजे निसर्गाने ठरवून दिलेल्या त्याच्या सरासरी कालावधीत हजेरी लावून महाराष्ट्रातून मॉन्सून १५ ऑक्टोबर रोजी परत फिरला. तो वेळेतच परतला, म्हणून मॉन्सूनचे हे वर्तन नैसर्गिक व सुयोग्य झाले असे समजावे.

मॉन्सून वेळेत परतल्यामुळेच मुळेच रब्बी हंगामाच्या पुढील सहा महिन्यांसाठी परंपरेने चालत आलेल्या वातावरणीय घटना म्हणजे थंडी, बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे, त्यांची सरासरी वारंवारेतील संख्या, कमी होणारी गारपीट आणि माफक धुक्याचे प्रमाण, थंडीतील भू-दवीकरण (कमी बादड), भू-स्फटिकीकरण (हिवाळ्यात बर्फाचा चुरा पडणे), शिवाय वेळेतच पुन्हा ईशान्य मॉन्सूनचे निर्गमन होणे इत्यादी वातावरणीय घटना मार्च - एप्रिलपर्यंत सुयोग्य असे वातावरणीय बदल शेतीसाठी घडून येतील, असे वाटते.

दक्षिणेकडील चार राज्यांत होणाऱ्या मॉन्सूनचे स्वरूप ः १५ ऑक्टोबर पासूनच ईशान्य मॉन्सूनचे नैरूत्य मॉन्सूनोत्तर हिवाळी पावसात रूपांतर झाले, म्हणजेच पुढील

तीन महिन्यांसाठी तेथील चार राज्यात ईशान्य मॉन्सूनचे तेथे त्याचवेळी लगेचच आगमन झाले असेच समजावे. महाराष्ट्रातही यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मॉन्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते.

पुढील ३ दिवसांतील पाऊस ः १५ ऑक्टोबरपासून ते १७ ऑक्टोबर दरम्यानच्या तीन दिवसांत कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत मात्र मध्यम पावसाची शक्यता अधिक असेल, असे वाटते.

२२ ते २६ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या आवर्तन ः ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान पावसाचे दुसरे आवर्तन त्याच्या नियोजित तारखेऐवजी ४ दिवस अगोदर म्हणजे १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जाणवते. विशेषतः मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवते.

सध्याच्या तापमानाचा परिणाम

सध्या कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे २३ अंश सेल्सिअस दरम्यान जाणवते. दोन्हीही तापमानातील दहा अंशांचा फरक तसेच पहाटेचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा २ अंशांनी कमी असेल. म्हणून ऑक्टोबरअखेर अपेक्षित थंडीचा हळूहळू प्रभाव दिसेल. दुपारचे कमाल तापमान हे सरासरी इतके म्हणून उर्वरित ऑक्टोबर महिन्यात ‘ऑक्टोबर हीट’चाही परिणाम जाणवू शकतो, असे वाटते.

कमाल आणि किमान या दोन तापमानातील सध्याचा फरक हा वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण हळूहळू कमी होऊन पावसाचे प्रमाणही कमी होत जाईल. सकाळी पडणारे दवीकरण सध्या कमी होईल. नंतर मात्र निरभ्र आकाशासहित हळूहळू थंडी जाणवू लागेल. कारण ‘ला- निना’ अजून दिसून आलेला नाही.

माणिकराव खुळे, ९४२३२१७४९५

(ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT