Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Return : मॉन्सून महाराष्ट्राच्या काही भागातून परतला

Maharashtra Weather Alert : मॉन्सूननं ६ ऑक्टोबर रोजी काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय.

Dhananjay Sanap

Maharashtra Weather Update : मागील तीन दिवसांपासून मॉन्सून परतीचा प्रवास एकाच जागे अडखळला होता. परंतु आज म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी मॉन्सूननं काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. 

आज नैऋत्य मॉन्सून जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्यप्रदेशच्या उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. त्यासोबतच गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्याचा काही भागासोबतच मध्य महाराष्ट्र, कोकण आणि संपूर्ण उत्तर अरबी समुद्र तसेच मध्य अरबी समुद्राचा काही भागातून मॉन्सूननं माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं.

तसेच पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्यास पोषक स्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे. आज मॉन्सूनच्या परतीच्या सीमा लखनऊ, सटाणा, नागपूर, परभणी, पुणे आणि अलिबाग भागात आहे.

राज्यात कोरड्या हवामानामुळे पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. ऑक्टोबर हिटमध्ये उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानसह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT