Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सूनचा काढता पाय

Latest Monsoon News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) महाराष्ट्रातून निरोप घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) महाराष्ट्रातून निरोप घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित देशातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. लवकरच मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने २५ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. शुक्रवारी (ता. ६) सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदरच मॉन्सून जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून परतला होता.

तर सोमवारी (ता. ९) मॉन्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली. शुक्रवारी (ता. १३) मॉन्सूनने परतीची वाटचाल कायम ठेवली आहे.

शुक्रवारी (ता. १३) संपूर्ण झारखंड, ओडिशा, छत्तीसगडसह पश्‍चिम बंगाल, तेलंगणाचा बहुतांश भाग, तसेच आंध्र प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांतून माघार घेतली आहे.

मॉन्सूनची परतीची सीमा मालदा, विशाखापट्टण, नालगोंडा, रायचूर ते वेंगुर्लापर्यंत पोहोचली आहे. मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असून, लवकरच संपूर्ण देशभरातून मॉन्सून परतणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT