Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: माॅन्सूनची पुणे, नांदेड, लातूर, धाराशिवपर्यंत मजल; बहुतांशी भागात पावसाचा अंदाज

Rain News : एका दिवसाच्या मुक्कामानंतर माॅन्सून आज राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली.

अनिल जाधव

Pune News : एका दिवसाच्या मुक्कामानंतर माॅन्सून आज राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने पुणे जिल्ह्यात प्रवेश करत मराठवाड्याच्याही काही भागात चाल केली. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. तर राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सांगली व्यापले आहे. तर रत्नागिरी, सातारा, सोलापूरचा बहुतांशी भाग व्यापला. तसेच पुणे, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या काही भागातही माॅन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

माॅन्सूनने महाराष्ट्रासोबतच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशातील आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनची सिमा आज हर्णे, बारामती, निजामाबाद, सुकमा, मलकणगिरी, विजयानगरम आणि इस्मालपूर या भागात होती.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुंबईसह आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तेलंगणाचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राचा उर्वरित भाग माॅन्सून व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील पुढील ४ ही दिवस बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्यभारात पावसाचा येलो अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर उद्या राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अनेक ठिकाणी अंदाज असून सिंधुदूर्गात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

तसेच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. सोमवारी आणि मंगळवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT