Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनची आगेकूच

Latest Monsoon Update : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने सुमारे आठवडाभरापासून मॉन्सूनची वाटचाल थबकली होती.

Team Agrowon

Pune Weather Update : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने सुमारे आठवडाभरापासून मॉन्सूनची वाटचाल थबकली होती. मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाल्याने कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागासह पूर्व भारतातील राज्यात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले, देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये वारे सात दिवस उशिराने ८ जून रोजी डेरेदाखल झाला. रविवारी (ता. ११) मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रगती केली आहे.

सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली होती. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर चाल केल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल अडखळली होती.

चक्रीवादळ निवळल्यानंतर ईशान्य राजस्थानमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (ता. १९) कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भागात प्रगती केली आहे.

तर पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्यांच्या काही भागात मॉन्सून आगेकूच केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा दक्षिण भारतात रत्नागिरी, रायचूर, कावलीपर्यंत तर पूर्व भारतात कॉनिंग, शांतीनिकेतन, दुमकापर्यंत आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग, तसेच ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात गुरुवारपर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT