Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Update : मॉन्सून परतीची वाटचाल काहीशी अडखळली

Maharashtra Monsoon News : दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : मॉन्सूनने सोमवारी (ता. ९) बहुतांश महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. त्यानंतर मॉन्सूनची परतीची वाटचाल काहीशी अडखळली आहे. दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

मॉन्सून परतल्यानंतर राज्यात बहुतांश भागात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उन्हाचा चटका कायम असतानाच, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तसेच उत्तर बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तमिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपासून कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

‘ऑक्टोबर हीट’चा चटका चांगलाच वाढल्याने ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे. गेले काही दिवस अनेक ठिकाणी सातत्याने पारा ३५ अंशांवर आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला, जळगाव, नागपूर, वाशीम येथे तापमान ३६ अंशांपुढे होते. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.७, जळगाव ३६.२, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्‍वर २६.४, नाशिक ३३.७, सांगली ३२.७, सातारा ३२.८, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३३.५, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३३.५, छत्रपती संभाजीनगर ३४.२, परभणी ३५.७, अकोला ३७.२, अमरावती ३५, बुलडाणा ३३.२, ब्रह्मपुरी ३५.८, चंद्रपूर ३५, गडचिरोली ३४.८, गोंदिया ३४.९, नागपूर ३६.१, वर्धा ३५.५, वाशीम ३६, यवतमाळ ३५.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT