Weather Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून दारात; गोव्यापर्यंत मुसंडी; राज्यात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Update : पुढील ३ दिवसांमध्ये राज्यात माॅन्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनची वाटचाल सुरुच आहेत. माॅन्सूनने आज संपूर्ण गोवा राज्य व्यापले आहे. तर माॅन्सून वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ३ दिवसांमध्ये राज्यात माॅन्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले. तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तेलंगाणाचा आणखी काही भाग आणि संपूर्ण रायलसिमा व्यापले. माॅन्सूनची सिमा गोवा, गडग, नारायणपेठ, नरसापूर आणि इस्लामपूर भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे. माॅन्सून पुढच्या ३ ते ४ दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

तसेच कर्नाटकचा उर्वरित भाग, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT