Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून उद्यापर्यंत अंदमानात

Weather News : पोषक हवामान; गतवर्षीपेक्षा तीन दिवस उशिरा दाखल होणार

Team Agrowon

Weather News : पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ (Mocha Cyclone) निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.

शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.

तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १९ मेपर्यंत मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी १६ मे रोजी मॉन्सूनने अंदमान बेटांचा बहुतांशी भाग व्यापला होता. तर २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून १० जून महाराष्ट्राच्या तळकोकणात दाखल झाला होता.

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सर्वसाधारण (९६ टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ११ एप्रिल रोजी जाहीर केला.

या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धनात्मक (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.

चार जूनपर्यंत मॉन्सूनच्या केरळ दाखल होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.


मॉन्सूनचे अंदमानातील आगमन
वर्ष---आगमन
२०१८---२५ मे
२०१९---१८ मे
२०२०---१७ मे
२०२१---२१ मे
२०२२---१६ मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT