Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : ‘मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल

Latest Monsoon Update : मॉन्सूनने जोरदार मुसंडी मारत तळ कोकणातील रत्नागिरी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या काही भागांत मजल मारली आहे.

Team Agrowon

Monsoon Arrived In Maharashtra : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे गती मिळाल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्रात दाखल झाले आहे. मॉन्सूनने जोरदार मुसंडी मारत तळ कोकणातील रत्नागिरी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या काही भागांत मजल मारली आहे. उद्यापर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सून गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. १०) मॉन्सूनने पश्‍चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली होती.

रविवारी (ता. ११) वेगाने वाटचाल करत कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत वाटचाल केली आहे.

बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हसन, धर्मापुरी, श्रीहरीकोटापर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला आहे.

मॉन्सून स्थिती थोडक्यात...

- मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हसन, धर्मापुरी, श्रीहरीकोटापर्यंत

- साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल

- मंगळवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत प्रगती शक्य

पुढील वाटचालीस पोषक हवामान

पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत (ता. १३) तमिळनाडूचा संपूर्ण भाग, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, पश्‍चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीममध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Stock India : देशातील युरियाची विक्री वाढली; डीएपीची विक्री घटली, खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा

Urea Purchase: शेतकरी घरबसल्या करु शकतात युरिया बुकिंग; तेलंगणा सरकारची विशेष सुविधा

Livestock Care: पशुसंवर्धन सल्ला (कोकण विभाग)

CCI Cotton Procurement: अकोटमध्ये ‘सीसीआय’ची कापूस खरेदी

Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग)

SCROLL FOR NEXT