Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सून एक्सप्रेस आज कुठपर्यंत पोचली?

Monsoon Update : मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा वेरावळ, वल्लभनगर, विद्यानगर, उदयपूर, अंबालापर्यंत होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.

Team Agrowon

Weather Update : सलग दोन दिवस देशात वेगाने प्रवास करणाऱ्या माॅन्सूनने आजही बऱ्याच भागात प्रगती केली. यामुळे अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.

तर शेतकऱ्यांनीही पेरण्यांची लगबग सुरु केली. आज माॅन्सूनची सिमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती.

केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यानंतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १३ दिवस पुढील वाटचाल थांबली होती. पण चक्रीवादळ निवळल्यानंतर माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु झाला.

दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती.

रविवारी अरबी समुद्राचा आणखी काही भाग, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड राज्याचा संपूर्ण भागात मॉन्सून पोहोचला होता. गुजरात, राजस्थान, हरियाना, जम्मू- काश्मीरच्या काही भागातही तो दाखल झाला होता.

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा वेरावळ, वल्लभनगर, विद्यानगर, उदयपूर, अंबालापर्यंत होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.

माॅन्सूनने आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. आज उत्तर अरबी समुद्राच्या आणखी भागात, तसेच गुजरात, राजस्थान, हरियाना आणि पंजाबच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला.

तसेच जम्मू, काश्मिर आणि लडाखचा उर्वरित भाग माॅन्सूनने व्यापला. आज माॅन्सूनची सिमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती.

माॅन्सूनने मागील दोन दिवसांमध्ये वेगाने प्रवास केला. पुढील काळातही माॅन्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान आहे. माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये गुजरातच्या काही आणखी काही भागात दाखल होईल.

तसेच राजस्थानच्याही आणखी काही भागांमध्ये माॅन्सूनचा प्रवास होणार आहे. तर पंजाब आणि हरियानाचा उर्वरित भाग माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT