Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सून एक्सप्रेस पुन्हा सुसाट; कुठपर्यंत मारली मजल?

Monsoon Update : माॅन्सूनने अखेर आज पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. एकाच जागेवर तब्बल सहा दिवस मुक्काम केल्यानंतर माॅन्सूनने दक्षिण आणि उत्तर भारतात प्रगती केली.

Team Agrowon

Biperjoy Cyclone : माॅन्सूनने अखेर आज पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. एकाच जागेवर तब्बल सहा दिवस मुक्काम केल्यानंतर माॅन्सूनने दक्षिण आणि उत्तर भारतात प्रगती केली. तर बिपरजाॅय चक्रीवादळ निवळले असून ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

एकाच जागेवर तब्बल सहा दिवस ठाण मांडून असलेल्या माॅन्सूनने आज पुन्हा प्रवासाल सुरुवात केली. बिपरजाॅय चक्रीवादळ निवळल्यानंतर माॅन्सूनची रखडलेली वाटचाल पुन्हा सुरु झाली.

वाटचाल सुरु झाली असानाच माॅन्सूनने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तसचे बंगालच्या उपसागरच्या काही भागांमध्ये प्रगती केली. त्याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडचा काहीभागात माॅन्सूनने  प्रगती केली. माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. माॅन्सून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण द्वापकल्पचा आणखी काही भाग, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल तसेच झारखंडचा काही भागात भागात प्रगती करु शकतो.

तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात माॅन्सूनची प्रगती होणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

बिपरजाॅय चक्रीवादळाची प्रणाली आता निवळली आहे. ईशान्य राजस्थान आणि परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासांमध्ये ते पुर्वेकडे सरण्याची शक्यता आहे.

तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्या पासून केरळच्या किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. हा कमी दाबावाचा पट्टा ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT