Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सूनची वाटचाल कायम; माॅन्सून २४ तासात आणखी पुढे सरकणार; राज्यात पावसाचा अंदाज

Weather Update : माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे पुढील २४ तासात माॅन्सून आणखी काही भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे पुढील २४ तासात माॅन्सून आणखी काही भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.

माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज श्रीलंका, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर या भागात माॅन्सूनने प्रगती केली. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. माॅन्सून पुढील २४ तासांमध्ये श्रीलंकेचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालचा उपसागर या भागात प्रगती करण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अति कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. तर उद्या सकाळपर्यंत याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यताही हवामाना विभागाने व्यक्त केली. हे चक्रीवादळ उद्या मध्य रात्रीपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान सागर बेट आणि खेपूपुरा दरम्यान सरकण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. तर यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तसेच जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर कोकणातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच कोल्हापूर, सातारा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT