Weather Update : मॉन्सूनचे आगमन (Mansoon) निर्धारित वेळेत अंदमान समुद्रात झाले आहे. हा अंदाज मागील सोमवारी (ता. १५) वर्तवला होता. सद्यपरिस्थितीत मॉन्सून ५ ते ६.५ उत्तर अक्षांश व ८५ ते ९० पूर्व रेखांशावर असून, तो अंदमान निकोबार बेटावर पोहोचला आहे. त्याची प्रगती या पुढे १० अक्षांश उत्तरेस व ९८ अंश पूर्व रेखांशाचे दिशेने होईल. बंगालच्या उपसागराच्या बराचसा भाग तो व्यापेल.
मंगळवारी (ता. २३) अरबी समुद्रात १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढेल. तर शुक्रवार (ता. २६) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. आणि त्यापुढील काळात मॉन्सून बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग व्यापेल. अशाप्रकारे या आठवड्यात मॉन्सूनची प्रगती होईल. या आठवड्यात हवामान ढगाळ राहील.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमान राहील. त्यामुळे उष्णतेच्या लाटा जाणवतील.
समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानाचा परिणाम हवामानावर मोठ्या प्रमाणात होतो. अरबी समुद्र बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान या आठवड्यात ३० अंश सेल्सिअस राहील. मात्र प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
यावरून प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान या पुढे वाढत जाणे शक्य आहे असे दिसून येते. त्यामुळे अमेरिकेच्या एन.ओ.ए.ए. या संस्थेने ‘एल निनो’ बाबतच्या दिलेला अंदाज विचारात घ्यावा लागेल. मॉन्सूनवर १५ जुलैनंतर परिणाम होणे शक्य आहे. त्यानुसार पीक पद्धती निवडणे व वेळेवर पेरणी करणे गरजेचे आहे.
मॉन्सून काळातील पावसाचा विचार करता, मॉन्सूनचा उगम आणि प्रगती अत्यंत महत्त्वाची असते. दक्षिण गोलार्धातील ५ ते १० दक्षिण अक्षांशामध्ये आणि ७० ते ८० रेखांशामध्ये मंगळवारी (ता. १६) मॉन्सूनचा उगम झाला आहे. प्रतिदिनी त्याची प्रगती होत आहे.
मोरवा वादळाच्या प्रभावामुळे मॉन्सूनच्या प्रगतीमध्ये काहीसा उशिरा होत आहे. मंगळावर (ता. २३)पर्यंत मॉन्सून अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन हे निर्धारित वेळेपेक्षा ४ ते ५ दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात या आठवड्यात कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे प्रखर उन्हाळा, उष्मा आणि उष्णतेच्या झळा जाणवणे शक्य आहे.
हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल, अरबी समुद्राचे उत्तरेकडील भागावर १००८ हेप्टापास्कल, तर बंगालचे उपसागरावर शुक्रवारी (ता. २६) १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. त्या वेळी मॉन्सूनची प्रगती वेगाने होण्यास सुरुवात होईल. तसेच महाराष्ट्रावरील हवेचे दाबही कमी होतील. मॉन्सूनचे प्रगतीला हवामान अनुकूल बनत आहे.
समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानाचा परिणाम हवामानावर मोठ्या प्रमाणात होत असतो. अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान हे एकसमान म्हणजेच ३० अंश सेल्सिअस असे राहणे शक्य आहे.
मात्र प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळातही प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मॉन्सूनवर १५ जुलैनंतर होण्याची शक्यता आहे.
कोकण ः
कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर धुळे नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ६५ ते ६७ टक्के, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४१ ते ५८ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १५ ते २० किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील.
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर बीड व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.
धाराशिव, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १४ टक्के इतकी कमी राहील.
त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा धाराशिव व लातूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते २३ किमी राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २० किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ टक्के इतकी कमी राहील.
वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात १२ किमी आणि वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.
चंद्रपूर जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व पुणे व नगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.
सांगली व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ५४ ते ५६ टक्के, तर पुणे व नगर जिल्ह्यांत ४६ ते ४९ टक्के राहील.
सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते २० किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- खरीप पिकांचे लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
- तापमानात वाढ झाली असल्याने फळबागांमध्ये झाडांभोवती गवताचे आच्छादन करावे. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
- गोठ्यातील जनावरे, कुक्कुटपक्ष्यांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे
- पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.