Rain Alert Agrowon
हवामान

Monsoon Alert : जोरदार पावसाचा येलो अलर्ट, पण पाऊसच नाही; आजही जोरदार पावसाचा अंदाज

Md Rainfall alert : विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील काही जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Team Agrowon

Yellow Alert : राज्यात कालपासून माॅन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. पण राज्याच्या बहुतांशी भाग कोरडाच आहे. केवळ ढगाळ वातावरण दिसतं. हवामान विभागानं आजही राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला. विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील काही जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

राज्याच्या काही भागांमध्ये कालपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. पण तुरळक ठिकाणी जोरदार सरी झाल्या. त्यातही हा पाऊस अगदी थोड्या ठिकाणी पडल्या. सर्वदूर जोरदार पावसाची प्रतिक्षा आजही कायम होती. हवामान विभागाने आजही संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला.

हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तसेच बुलडणा, अकोला, अमवरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज म्हणजेच येलो अलर्ट दिला.

खानदेशातील जळगाव आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्याच्या इतर भागातही ठिकठिकाणी जोरदार तसेच मध्यम सरी होतील, असा अंदाज आहे. उद्याही विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ठिकठिकणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

राज्याच्या अनेक भागात दोन ते तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण कालही पावसाने हुलकावणी दिली. आजतरी पाऊस पडतो का? याची वाट शेतकरी पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT