Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : घाटमाथा, कोकणात पावसाच्या मध्यम सरी

Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. या भागात पाऊस नसल्याने पिके वाफसा अवस्थेत येऊ लागली आहेत.

Team Agrowon

Pune News : कोकण, खानदेश आणि घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात १७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे ओढ्या नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. या भागात पाऊस नसल्याने पिके वाफसा अवस्थेत येऊ लागली आहेत.

कोकणातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून या भागात पावसाचा जोर कमी झाला होता त्यानंतर पुन्हा रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आहेत. रायगडमधील मोराबी येथे १२१ मिलिमीटर, तर पवयंजे ११७, बिरवडी ९९ मिलिमीटर पाऊस झाला. तर ठाण्यातील नयाहडी येथे ९१ मिलिमीटर, रत्नागिरीतील चिपळूण, सौंदळ येथे ४७ मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील आबोली, वैभववाडी येथे ५१ मिलिमीटर, पालघरमधील विक्रमगड येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे अजूनही ओढे, नाले भरून वाहत आहेत.

मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामध्ये नाशिकमधील उंबरठाणा येथे ६९ मिलिमीटर, तर इगतपुरी ६८, सुरगाणा ४५, हरसूल, थानापाडा ४०, वेळुंजे ३९, बाऱ्हे, मनखेड ३७ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ९५ मिलिमीटर, तर कार्ला ५७, पानशेत ५४, लोणावळा ५१, भोलावडे ४५, माले, मुठे ४२ मिलिमीटर, सोलापुरातील दुधनी, मैंदर्गी येथे ३६ मिलिमीटर, साताऱ्यातील लामज येथे ५८ मिलिमीटर, कोल्हापुरातील कडेगाव येथे ५६ मिलिमीटर, राधानगरी ३६, गगनबावडा ३२ मिलिमीटर पाऊस झाला.

उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत आहे. तर खानदेशातील नंदुरबारमधील खापर येथे ५० मिलिमीटर, तर मोरांबा ४६, धानोरा, अक्कलकुवा ४० मिलिमीटर, जळगावमधील तळेगाव येथे ४९ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर तुरळक ठिकाणी मध्यम सरी कोसळल्या आहेत. यात जालन्यातील बवने पांगरी येथे ३६ मिलिमीटर, नांदेडमधील भोकर येथे ४५ मिलिमीटर, हिंगोलीतील नांदापूर, हिंगोली ३५, नरसी ३१ मिलिमीटर पाऊस झाला.

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील चांदई येथे २७ मिलिमीटर, वाशीममधील राजगाव ३३, शिरपूर, करंजी ३२ मिलिमीटर, गोंदियातील काट्टीपूर येथे ५६ मिलिमीटर, तर आमगाव ५५, कामठा ५४, सडक अर्जुनी ४४, दासगाव ३२, गोंदिया ३१, गोरेगाव ४२, कवरबांध ३३, सालकेसा, आमगो ३० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात पाऊस नसल्याने पिके चांगली तरारली आहे.

शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : नडगाव ४९, धसइ ६१, सरळगाव ६४, कुमभर्ली ४४, बदलापूर ४२, पोयनाड, रामराज ४७, चरी ५१, पनवेल ७४, ओवले ७५, कर्नाळा ७४, तळोजे ६३, कळंब ५४, इंदापूर, निजामपूर ४६, रोहा ४५, नागोठणे ४२, कोलाड ५१, वाकण ५२, खेर्डी, धामनंद ४३, कळकवणे, शिरगांव, भरणे ४६, शिर्शी, दाभीळ ४५, डहाणू, मालयण, साइवन, कसा, तलवड ५०, खोडला ४५, तलसरी ४७.

या घाटमाथ्यावर पडला सर्वाधिक पाऊस

घाटमाथा पाऊस

ताम्हिणी १७०

दावडी १३९

कोयना ९७

डुंगरवाडी ८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT