Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात काही ठिकाणी मध्यम पाऊस

Weather News : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील कोर्ची मंडलात १०२.८ मिलिमीटर पाऊस पडला असून मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे.

सध्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. तर घाटमाथ्यावर पावसाने काही प्रमाणात जोर ओसरला आहे. ताम्हिणी, दावडी, भिरा, डुंगरवाडी, कोयना, शिरगाव, लोणावळा या घाटमाथ्यावर मध्यम पाऊस पडला.

तर शिरोटा, ठाकूरवाडी, वानगाव, धारावी, वळवण या घाटमाथ्यांवर अधूनमधून सरी बरसल्या आहेत. नंदुरबारमधील वडफळी मंडलात ३७.० मिलिमीटर पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसत आहे. मात्र, पश्चिमेकडील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे.

मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक ४७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांत ओढे नाले खळाळून वाहत आहे. तर गुंजवणी, वडीवळे, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरण क्षेत्रात हलक्या सरी पडल्या असून उर्वरित खडकवासला, पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, भाटघर, नीरा देवघर, माणिकडोह, डिभे, चिल्हेवाडी या धरण क्षेत्रांत पावसाचा शिडकावा झाला. साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात हलका, तर कोल्हापूर गगनबावडा मंडलात ३३.३ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात पावसाची उघडीप आहे.

कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. रायगडमधील नंदगाव मंडलात सर्वाधिक ९१.५ मिलिमीटर, तर अलिबाग ५६.८, चौल ५७.८, पवयंजे, मोराबी ८२.८, कर्जत, चौक ८९.५, कापरोली, जसइ, हमरापूर ८५.८, कसू ६५.५, रोहा ५१.८, चानेरा ५३.३, बवरली ५७.८, ठाणे जिल्ह्यातील ठाणे ७०.८, मुंब्रा ५२.८ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्यात पाऊस नसला तरी शेतीकामे वेगात सुरू आहेत. सध्या कापूस, मूग, सोयाबीन अशी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अनेक ठिकाणी खुरपणीचे कामे सुरू आहेत. अधूनमधून होत असलेल्या शिडकाव्यामुळे पिकांना चांगलाच आधार मिळत आहे.

विदर्भातील यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला. गडचिरोलीतील शंकरपूर मंडलात ९५.८, बेडगाव ६८.५, तर गोंदियातील ठाणेगाव ६६.५, वाडेगाव ६०.८, गोरेगाव, कुऱ्हाडी ६०.३ मिलिमीटर पाऊस झाला.

शुक्रवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर (स्रोत : कृषी विभाग)

विदर्भ : दारव्हा २१.३, लोही २५.०, शहापूर २१, भंडारा ३८, धारगाव २८.३, कट्टीपूर २६.३, आमगाव ४०, मोहाडी २७.३,, कवरबांध ३९, बोधगाव देवी, अर्जुनी मोरगाव ४५.३, कुरखेडा २९, पुराडा २६, कमलापूर ४६.८, कोटगुळ ४७.३, देसाईगंज ५५.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT