Agriculture Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : मध्यम थंडीसह ढगाळ व कोरडे हवामान

Weather Forecast : वायव्येकडून व उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण चांगले राहते. मात्र त्या वेळी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. कोकणात ढगांचे प्रमाण अधिक राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. जेव्हा हवेचे दाब अधिक असतात, त्या वेळी तापमान कमी राहते. तसेच वायव्येकडून व उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण चांगले राहते. मात्र त्या वेळी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. कोकणात ढगांचे प्रमाण अधिक राहील.

उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांसह पश्‍चिम विदर्भातील अकोला व वाशीम जिल्ह्यांत, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. त्यामुळे पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग अधिक राहील.

‘एल-निनो’चा प्रभाव संपुष्टात आला असून, प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान विषुववृत्तीय भागात क्वचित ठिकाणी ३० अंश सेल्सिअस इतके आहे. तर बऱ्याच ठिकाणी तापमान २८ अंश सेल्सिअस इतके कमी आहे. हिंदी महासागराचे विषुववृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान काही ठिकाणी ३० अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे.

त्यामुळे एल-निनोचा प्रभाव संपलेला आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) पॉझिटिव्ह झाल्याने उन्हाळी हंगामात यापुढे पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यामुळे सध्या तरी चक्रीवादळाची शक्यता नाही. सध्याचे हवामान रब्बी पिकांचे काढणीस अनुकूल आहे.

कोकण

कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ ते ३९ टक्के, रायगड जिल्ह्यांत ४७ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५४ ते ५६ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ टक्के, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३२ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत काही दिवशी आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व वायव्य या दोन्ही दिशेने राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदुरबार जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील.

मराठवाडा

लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान परभणी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशीव या जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान हिंगोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर लातूर, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात किमान

तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर बीड व धाराशीव जिल्ह्यात ढगांचे प्रमाण अधिक राहील. लातूर, नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३७ टक्के, नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यांत ४२ ते ४८ टक्के तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. तर दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आग्नेयेकडून तर बुलडाणा जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर यवतमाळ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. इतका राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४३ ते ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १५ ते २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ४७ टक्के, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ५६ ते ५९ टक्के, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ६० ते ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे २६ ते ३० टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ किमी इतका राहील. तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला

उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करण्यासाठी पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.

कलिंगड, टरबूज लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.

फळबागांना ठिबक सिंचन प्रणालीद्वारे सिंचन करण्यावर भर द्यावा. फळबागांमध्ये आच्छादन करावे.

जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसांत सकस हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिकांची लागवड करावी.

आंबा मोहराचे संरक्षण करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT