Weather Update Pune : कोकण वगळता उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किमान तापमान घसरू लागल्याने गारठा वाढू लागला आहे.
शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात घट होत असल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कमी झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुपारचे तापमान ३३ अंशांच्या खाली आले आहे. शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर, अकोला, ब्रह्मपुरी, वाशीम येथे तापमानाचा पारा पस्तिशीपार आहे.
किमान तापमानाचा पारा घसल्याने राज्यात थंडीची लाट वाढू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे नीचांकी तापमान नोंदले गेले असून, निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि वाशीम येथे तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आला आहे. पहाटे गारठा जाणवू लागला असून, काही भागांत धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. किमान तापमानात हळूहळू घट होऊन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.३ (१४.५), जळगाव ३४.७ (११.४), कोल्हापूर ३२.६ (१८.६), महाबळेश्वर २५.६ (१५.६), नाशिक ३२.३ (१४.५), निफाड ३३ (१३.१), सांगली ३३.३ (१७.८), सातारा ३२.१ (१५.७), सोलापूर ३५ (१६.१), सांताक्रूझ ३६.५ (२१.६), डहाणू ३४.६ (२१.४), रत्नागिरी ३६.७ (२२),
छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१४.२), नांदेड ३२.२ (१८.४), परभणी ३३.४ (१५.९), अकोला ३५.१ (१७.५), अमरावती ३३.४ (१६.५), बुलढाणा ३२.७ (१७.६), ब्रह्मपूरी ३५ (१८.४), चंद्रपूर ३१.८ (१६.४), गडचिरोली ३२.६ (१५.४), गोंदिया ३२.२ (१५.४), नागपूर ३२.२ (१५.९), वर्धा ३२ (१६.४), वाशीम ३५.२ (१४.८) यवतमाळ ३४.७ (१५.२).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.