Rain Update Agrowon
हवामान

Rain Alert : विजांसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : गुजरातमधील वादळी प्रणालीने बाष्प खेचून नेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पुन्हा पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरातमधील वादळी प्रणालीपासून (डीप डिप्रेशन) पासून उदयपूर, शिवपूरी, सिधी, अंबिकापूर, पूरी, मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आहे. यातच दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पावसाच्या उघडिपीमुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३४.८ अंश तापमानाची नोंद झाली.

कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) विदर्भात पाऊस सुरू होणार असून, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळ अनुभावातला मिळणार आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

गुजरातमधील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) अरबी समुद्राकडे सरकत आहे. गुरुवारी (ता. २९) ही प्रणाली गुजरातच्या भूजपासून ६० किलोमीटर वायव्येकडे, नालियापासून ८० किलोमीटर ईशान्येकडे होती. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज (ता. ३०) सौराष्ट्रच्या किनाऱ्यालगच्या अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत.

चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे झेपावता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Education Policy: प्रश्‍न विचारा पुन्हा पुन्हा ...

Maharashtra Marketing Board: नव्या व्यवस्थेत न्याय मिळेल?

Heavy Rainfall: जुन्नर-नारायणगाव परिसरात पावसाचा दणका

Vice Chancellorship Selection: कुलगुरू पदासाठीच्या मुलाखतीला चौकशीच्या भोवऱ्यातील शास्त्रज्ञ

Government Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?

SCROLL FOR NEXT