Market Bulletin: कापूस स्थिरावलादेशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावला आहे. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा अधिक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सीसीआयची कापूस खरेदीही बंद झाली आहे. त्यामुळे काही शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत. सध्या बाजारात कापूस सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही कमी प्रतिसाद मिळत आहे. सीसीआयची कापूस विक्री मात्र कायम राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कांदा दबावातबाजारातील कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचा भाव दबावात आला आहे. बाजारातील आवक सध्या वाढत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत असल्याचे काही भागातील शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात कांदा सरासरी ७०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकला जात आहे. कांदा निर्यातीवरही युध्दाचा परिणाम जाणवत आहे. तसेच आवक काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: हरभरा भाव दबावात; सोयाबीन स्थिरावले, संत्रा आवक टिकून, गहू नरमला तर डाळिंबाला उठाव.मिरचीला उठाव टिकूनराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर.बेदाण्याला उठावदेशातील बाजारात बेदाण्याला सध्या चांगला उठाव आहे. रमजान महिन्याची मागणी आल्याने दराला आधारही मिळत आहे. आखातातील निर्यातीवर परिणाम झाला असला तरी देशात मागणी आहे. देशात सध्या बेदाण्याचा पुरवठा सरासरीपेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे बेदण्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या बेदाणा सरासरी १५ हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. बेदण्याला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे बेदण्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..केळीला उठावराज्यातील बाजारात सध्या केळीला चांगला उठाव मिळत आहे. केळीची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. यंदा पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा केळीला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर रमजान महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळत आहे. गुणवत्तेची केळी चांगलाच भाव खात आहे. सध्या बाजारात केळी प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. आखाती देशांमध्ये केळीची निर्यात बंद झाली आहे. याचा परिणाम दरावर दिसत आहे. केळीचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.