Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : हवामान विभागाने दिला पुढील पाच दिवसांचा अंदाज

Weather Forecast : पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Dhananjay Sanap

Weather News : उत्तर महाराष्ट्र सध्या गारठला आहे. उर्वरित राज्यातही पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे. परंतु राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. तसेच काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणही झाले आहे.

हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर आज गडचिरोली  जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच बिहारमध्ये पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ४.८ अंश सेल्सिअसवर घसरले होते. दिल्लीतही पारा ४ अंशांवर आला होता.

त्यामुळे देशभरात पुढील २४ तासांत थंडीचा जोर आणखी वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानात चढ- उत्तार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरले आहे.

मागील २४ तासात जळगाव येथे ९ अंश सेल्सियसची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची तर उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Import: यंदा खत आयात ७६ टक्क्यांनी वाढणार, खर्च विक्रमी १८ अब्ज डॉलर्सवर?

Ativrushti Madat : गुजरात सरकारने ३२ लाख अतिवृष्टीबाधितांना वितरीत केले ९ हजार ४६६ कोटी रुपये; कृषिमंत्री वाघानी यांचा दावा

Cash Crops: नगदी पिकांकडे वाढता कल

E-Crop Survey: ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

Agriculture Equipment Theft: धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT