Monsoon  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. ३) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. ३) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, दिल्ली, लखनौ, वाराणसी, दलतोंगांज, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर टिकून असल्याचे दिसून आले. शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील दावडी येथे २०० मिलीमीटर, शिरगाव येथे १८०, ताम्हिणी येथे १७०, डुंगरवाडी १६०, भिरा १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. तर राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३) पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजी, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT