Weather News Agrowon
हवामान

Weather News : सूर्य तळपला, महाराष्ट्र तापला

High Temprature : अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४१.५ अंश तापमान

Team Agrowon

Summer Season : पुणे : सूर्य तळपू लागताच राज्यात उन्हाच्या झळा तापदायक होऊ लागल्या आहेत. तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे. विदर्भातील अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २८) कमाल तापमानातील वाढ टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व विदर्भापासून दक्षिणअंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पूर्व विदर्भात ढगाळ तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आहे. उन्हाचा चटका सातत्याने वाढतच असून, दुपारच्या वेळी झळा, उकाडा कायम आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अकोल्यासह वाशीम, सोलापूर, मालेगाव येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे आहे. तर जळगाव, परभणी, वर्धा, अमरावती, बीड, बुलडाणा, यवतमाळ, ब्रह्मपुरी येथे पारा चाळिशीपार आहे. राज्यात उन्हाची ताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३८.९, धुळे ३९.५, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्‍वर ३३.३, मालेगाव ४१, नाशिक ३८.३, निफाड ३७.८, सांगली ३८.७, सातारा ३८.९, सोलापूर ४१.४, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३२.६, रत्नागिरी ३२.२, छत्रपती संभाजीनगर ३९.५, बीड ४०.३, नांदेड ३९.८, धाराशिव ३९.२, परभणी ४०.८, अकोला ४१.५, अमरावती ४०.४, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ३८.६, गडचिरोली ३७.८, गोंदिया ३८, नागपूर ३९, वर्धा ४०.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४०.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT