Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम

Summer Season : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या वर असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या वर असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १५) राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता आहे. यातच उद्यापासून (ता. १) विदर्भात पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम बंगाल ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत तसेच पूर्व विदर्भापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्के सक्रिय आहेत. तर उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

यामुळे विदर्भात आकाश ढगाळ होऊन उद्यापासून (ता. १६) विदर्भात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. तापमानात चढ-उतार होत असले तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. पुढील काळात उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे.

गुरूवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर, ब्रह्मपूरी, यवतमाळ येथेही पारा ३९ अंशांपार कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे आहे. आज (ता.१५) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरूवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.४ (१४.९), धुळे ३५.५ (११.७), जळगाव ३५.८ (१६.६), कोल्हापूर ३६.६ (२०.३), महाबळेश्वर ३०.४ (१७.२), मालेगाव ३६.६ (१७.२), नाशिक ३३.८ (१५.६), निफाड ३३.८ (११.५), सांगली ३७.५ (२०.१), सातारा ३७.१ (१७.६), सोलापूर ३९.६ (२१.६), सांताक्रूझ ३१.७ (२१.३), डहाणू - (१९.५), रत्नागिरी ३१.६ (२१.७),

छत्रपती संभाजीनगर ३६.१ (१८.५), नांदेड ३७.४ (२०.४), परभणी ३८.२ (२१.६), अकोला ३८.० (१९.०), अमरावती ३६.६ (१८.८), बुलढाणा ३४.७ (२०.२), ब्रह्मपूरी ३९.३ (१९.७) चंद्रपूर ३९.४ (१८.६), गडचिरोली ३६.० (२०.४), गोंदिया ३७.० (१७.८), नागपूर ३८.७ (१८.४), वर्धा ३८.८ (२१.०), वाशीम ३८.४ (१८.२), यवतमाळ ३९.० (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT