Monsoon Rain Agrowon
हवामान

August Monsoon Rain : ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस; ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार: हवामान विभाग

Weather Update : पुढील दोन महिन्यांमध्ये म्हणेजच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडू शकतो. मात्र पुढील दोन महिन्यांमध्ये म्हणेजच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हवामान विभागाने दिला. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज आज (ता.१) जाहीर केला. त्यांनी सांगितले की जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १.८ टक्के जास्त होते.

तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस पडला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८.९ टक्के कमी पाऊस झाला तसेच मध्य भारतात पावसाचे प्रमाणे सरासरीपेक्षा १६.८ टक्क्यांनी जास्त होते. दक्षिण भारतात पाऊस सरासरीपेक्षा २६.७ टक्क्यांनी अधिक झाला. 

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहील. मात्र ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भार, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारतातच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील अंदाज दिला. 

Aug-Sept Forecast

ऑगस्टमध्ये खंड पडणार?

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी पाऊस पडेल, अशा अंदाज दिला. मात्र देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असेही संकेत दिले. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

Aug Forecast

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT