Rain Agrowon
हवामान

Rain Update : राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी

Maharashtra Monsoon Update : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकणात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरूच आहे.

Team Agrowon

Pune Rain News : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकणात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरूच आहे. उर्वरित राज्यात मात्र हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पेरणी योग्य पाऊस झालेल्या भागात पेरण्यांना सुरुवात होणार आहे. भात खाचरात पाणी आल्याने भातलागवडीच्या कामांना वेग येणार आहे.

कोकणात दमदार पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस झाला. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी दमदार पाऊस पडला. कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या, मध्यम सरी सुरूच आहेत. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे भातरोपे पुनर्लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचा फटका घाटातील रस्त्यांना बसला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे रस्ता खचल्यामुळे सुमारे बारा तास वाहतूक ठप्प झाली.

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला होता. या पावसामुळे टोकणी आणि पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढे आले असले, तरी पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन वगळता इतर पिकांची पेरणी केलेली नाही.

- रत्नागिरीत मुसळधार पाऊस

- सातारा जिल्ह्यात तुरळक

- नागपूर व अमरावतीत ढगाळ वातावरण

- नाशिकमध्ये धरणाच्या पाणलोटात संततधार

- इगतपुरी अतिवृष्टी, सुरगाणा, पेठमध्ये दमदार

- पुणे, नगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

- मराठवाड्यात पावसाची उघडीप

- जळगाव, धुळे जिल्ह्यांत हलका पाऊस

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरींवर सरी

- सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण

१२० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची ठिकाणे :

पेण १६०, उरण १५० (जि. रायगड), विक्रमगड १३० (पालघर), दापोली १२० (जि. रत्नागिरी), अक्कलकुवा १७० (जि. नंदूरबार), महाबळेश्‍वर १२० (जि. सातारा).

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये) (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : पेण १६०, उरण १५०, विक्रमगड १३०, दापोली १२०, भिवंडी, पोलादपूर, चिपळूण, रोहा प्रत्येकी ११०, म्हसळा, माथेरान, मुरबाड प्रत्येकी १००, मंडणगड, राजापूर, वाडा, तळा, हर्णे, सुधागड पाली, शहापूर, कणकवली प्रत्येकी ९०, मुरबाड, जव्हार, श्रीवर्धन, वैभववाडी, वाकवली, कर्जत प्रत्येकी ८०, सावंतवाडी, वसई, मोखेडा, मोखेडा, महाड, मुलदे, दोडामार्ग, कल्याण, खेड, मालवण, अंबरनाथ प्रत्येकी ७०.

मध्य महाराष्ट्र : अक्कलकुवा १७०, महाबळेश्‍वर १२०, धाडगाव, इगतपुरी ११०, गगनबावडा, तळोदा प्रत्येकी ९०, हर्सूल, नावापूर, लोणावळा प्रत्येकी ८०, त्र्यंबकेश्‍वर, जावळी मेढा प्रत्येकी ५०, येवला, शहादा, पेठ, ओझरखेडा, राधानगरी प्रत्येकी ४०, साक्री, शिरपूर, पन्हाळा प्रत्येकी ३०.

मराठवाडा : पाथरी २०, मानवत १०.

विदर्भ : सालकेसा २०, कुही, सावनेर, गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जूनी, गोंदिया, तिरोडा, सडक अर्जूनी, चिखलदरा, भिवापुरी, तुमसर, अंजनगाव, पारशिवणी, अकोट प्रत्येकी १०.

घाटमाथा : ताम्हिणी १४०, डुंगेरवाडी १३०, अंबोणे, दावडी प्रत्येकी ११०, कोयना पोफळी १००, शिरगाव ९०, लोणावळा ८०, कोयना, खंद प्रत्येकी ७०, शिरोटा, वळवण ६०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT