Rain Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज

Rain Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान झाल्याने थंडी गायब झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान झाल्याने थंडी गायब झाली आहे. उन्हाचा चटका वाढला असून उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. ९) मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट अनुभवायला मिळाली आहे. गुरुवारी (ता. ८) राजस्थानातील सिकार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तराखंड, राजस्थानमध्ये किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान कायम आहे.

यातच पूर्व विदर्भात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून तेलंगना, कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होत आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, धाराशीव जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.५ (१४.०), धुळे ३२.० (११.६), जळगाव ३२.८ (१४.५), कोल्हापूर ३५.० (२०.७), महाबळेश्वर २९.६ (१५.१), मालेगाव ३३.२ (१६.६), नाशिक ३२.४ (१४.६), निफाड ३१.६ (१०.४), सांगली ३५.८ (१९.८), सातारा ३५.२ (१७.५), सोलापूर ३७.८(२०.२), सांताक्रूझ ३३.५ (१९.२), डहाणू २८.० (१९.९), रत्नागिरी ३३.२ (१९.७),

छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१६.२), नांदेड - (१८.८), परभणी ३४.९ (१७.३), अकोला ३४.१ (१७.०), अमरावती ३२.० (१७.१), बुलडाणा ३२.८ (१६.५), ब्रह्मपुरी ३३.९ (१७.६), चंद्रपूर ३३.६ (१६.८), गडचिरोली ३२.४ (१६.०), गोंदिया ३०.६ (१६.८), नागपूर ३१.४(१७.६), वर्धा ३३.५(१७.०), वाशीम ३५.० (१४.६), यवतमाळ ३३.५ (१६.५).

सोलापूर येथे उच्चांकी तापमान

राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, वाशीम यथे पारा ३५ अंशांच्या वर आहे. किमान तापमानाचा पारा ११ ते २१ अंशांच्या दरम्यान असून, थंडी गायब झाली आहे. आज (ता. ९) तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Protection : वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतांना तार कुंपण द्यावे : बारड

Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

Property Sale and Purchase Deals: खरेदी-विक्री व्यवहारांसाठी ‘आधार’ प्रमाणीकरण बंधनकारक

Data Hub Development: महाराष्ट्र ‘आशियातील सर्वांत मोठे डेटा हब’ बनेल: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

Moringa Processing Unit Inaugurated: आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा मार्ग; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्‌घाटन

SCROLL FOR NEXT