Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ८) राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज कायम असल्यानचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर बांग्लादेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे.

हा आस पंजाबच्या अमृतसरपासून कर्नाल, बरेली, गोरखपूर, भागलपूर, मालदा ते मनिपूरपर्यंत विस्तारला आहे. पुढील चार ते पाच दिवस मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाब पट्ट्याचा अभाव यामुळे मॉन्सूनमध्ये खंड पडल्याची स्थिती आहे. मॉन्सूनच्या कमजोर प्रवाहांमुळे राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप आहे.

तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडत आहे. आज (ता. ८) कोकणातील पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Dispute Resolution: पोलिसांच्या पुढाकाराने रस्त्यांचे १०४ वाद मिटले

Bird Flu: दीड हजार कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’

Banana Crop Care : उन्हाळ्यात केळी बागेचे नुकसान टाळण्यासाठी ५ उपाय!

Sangli District Bank: सांगली जिल्हा बॅंकेच्या शताब्दी वर्षात ठेवी १० हजार कोटी करणार

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

SCROLL FOR NEXT