Climate Update : नाशिक गेल्या दीड महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) पावसाने काही भागांत हजेरी लावली. नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तसेच सिन्नरच्या काही भागांत मध्यम ते जोरदार सरी झाल्याने पावसाअभावी ताणावर आलेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पूर्व नाशिकमधील नांदगाव, मालेगाव आणि येवला तालुक्यांतील एकाही महसूल मंडळात पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे असमान चित्र कायम आहे..जिल्ह्यात सरासरी ५.१ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे सर्वाधिक ४३ मिलिमीटर पाऊस झाला. सिन्नरमधील पांढुर्ली आणि इगतपुरीतील नांदगाव बुद्रुक येथे प्रत्येकी ३६, सुरगाणा ३२.५, तर नाशिक शहर व पाथर्डी येथे प्रत्येकी ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिंडोरीतील उमराळे २७.५, नानाशी २१.८, कोशिंबे १५.५, पेठमधील जोगमोडी २१.८, पेठ २०.५, करंजळी १९.८ आणि बागलाणमधील वीरगाव येथे २४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Nanded Rain: नांदेडला दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस.दिंडोरी तालुक्यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. खेडगाव, पांडाणे, जानोरी, मोहाडी, चिंचखेड, वरखेडा, पालखेड परिसरात पावसामुळे शेतीकामे खोळंबली. काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची छाटणी सुरू केली असून, अचानक आलेल्या पावसामुळे कामांना ब्रेक लागला. टोमॅटो पिकावरही पावसाचा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सिन्नरच्या पांढुर्ली परिसरात साडेसातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सोयाबीन, भात आणि भाजीपाला पिकांना या पावसाने तात्पुरता दिलासा दिला..Ahilyanagar Rain Deficit : अहिल्यानगरमध्ये पाच लाख हेक्टरवरील पिके संकटात.पूर्व भागाची चिंता कायमपूर्व भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नांदगाव, मालेगाव आणि येवला तालुक्यांतील अनेक महसूल मंडळे कोरडी राहिली. खरीप पिकांवर पावसाची ओढ कायम असून, रब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्याची प्रतीक्षा आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत अपेक्षित १३४.५.२ मिलिमीटरच्या तुलनेत केवळ ४५.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. .१ जूनपासून पुढे जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ८८४.८ मिलिमीटर असून २२ सप्टेंबरपर्यंत ६४७.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान, दारणा, गंगापूरसह जिल्ह्यातील १२ धरणांतून कमी-अधिक विसर्ग सुरू आहे. पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे जलसाठ्यांना काही प्रमाणात आधार मिळत असला, तरी पूर्व भागातील पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे आगामी परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.