Farmers Loan Issues: दुष्काळ परिस्थिती, नियमित तसेच वंचित कर्जदार, पीक विमा व जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज (दि. २३ सप्टेंबर) राज्यभर आंदोलने करण्यात आली. अहिल्यानगर, ठाणे, पालघर, बुलढाणा, गडचिरोली, सांगली, पुणे, रायगड, बीड, नांदेड आदी २१ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत सरकारमधील मंत्र्यांना निवेदनासोबत काजू व बदाम पाठवत याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. .याबाबत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, किसान सभेच्या वतीने आज सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चे काढण्यात आले. महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती, त्याच्याबरोबर नियमित आणि वंचित कर्जदारांचे प्रश्न, वनजमिनी, देवस्थान जमिनी आणि वेगवेगळ्या जमिनींचे प्रश्न, पीक विम्याचे काढून टाकण्यात आलेले ट्रिगर पुन्हा लागू करणे आदी मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. .राज्य सरकारच्या विरोधात किसान सभेने आझाद मैदानावर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सरकारमधील तीन मंत्र्यांनी किसान सभेसोबत चर्चा केली. नियमित, वंचित कर्जदारांना दिलासा देऊ. ज्या जमिनी शेतकरी कसतात; त्या त्यांच्या नावे कराव्यात. घरांच्या तळजमिनी नावे करण्यासाठी ठोस पावले उचलू, असे आश्वासन देण्यात आले होते..Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा.तसेच दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे आणि पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचेही मान्य केले होते. पण आंदोलन संपले की, 'आम्ही त्या गावचे नाही' असा पवित्रा सरकार घेते, असे यावेळीही झाले..Dharashiv Farmers Protest: करपलेलं सोयाबीन पीक घेऊन शेतकरी रस्त्यावर, धाराशिवमध्ये धुळे- सोलापूर महामार्ग रोखला.सगळ्या मागण्या मान्य करुनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचा निषेध आज करण्यात आला. तुम्ही दुष्काळाचा आढावा काजू- बदाम खाऊन घेत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. त्याचा निषेध करण्यासाठीही आज हे आंदोलन करण्यात आले. आज आम्ही महाराष्ट्रभर काजू आणि बदाम तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि महसूलमंत्र्यांना पाठवत आहोत. तुम्ही काजू, बदाम खा आणि आम्ही मात्र मरणाचे जिणे जगू, असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दिला असल्याचे नवले यांनी सांगितले. .'सरकारनं आता अंत पाहू नये'आज आम्ही तुम्हाला काजू- बदाम पाठवतोय. उद्या काय पाठवू? हे सांगता येणार नाही. सरकारने आता अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, किरण गहला, अर्जुन आडे, शंकर शिडाम, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, अजय बुरांडे, अनिल गायकवाड, उद्धव पौळ, दीपक लिपणे, रामेश्वर पौळ आदी कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.