Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज; अनेक भागात ढगाळ हवामानाची शक्यता 

Weather Update : राज्यात काही ठिकाणी आज हलक्या सरी पडल्या आहेत. तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला. हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात काही ठिकाणी आज हलक्या सरी पडल्या आहेत. तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला. हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली. 

हवामान विभागाने आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते, असाही अंदाज दिला.

उद्याही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर नगर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारीही काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पाऊस पडेल.

तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्या सरी पडतील. धुळे जिल्ह्यात शनिवार आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार तर पुण जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 

सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. जालना, धाराशीव, अमरावती, बीड जिल्ह्यात आज तर बुलडाणा, अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT