Cold Weather Agrowon
हवामान

IMD Cold Weather Prediction : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार

Weather Update : यंदाच्या हंगामात राज्यात थंडीचा कडाका कमीच असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यातही देशात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असल्याने गारठा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : यंदाच्या हंगामात राज्यात थंडीचा कडाका कमीच असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यातही देशात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असल्याने गारठा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

फेब्रुवारीमध्ये कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक असून, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी (ता. ३१) जाहीर केला.

देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी कमी राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा, तर कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

प्रशांत महासागरात सौम्य ‘ला-नीना’

प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. एप्रिल महिन्यापर्यंत सौम्य ला-निनो स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत असून, पुढील दोन महिन्यांत ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत.

सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

फेब्रुवारी महिन्यात देशात ८१ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी २२.७ मिलिमीटर पाऊस पडतो.

उत्तर भारतात पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ६५ मिलिमीटर असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागासह पश्‍चिम किनारपट्टी आणि केरळ, तमिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Blossom Disease: ढगाळ हवामानामुळे आंबा उत्पादक धास्तावले

Agri Export Scam: शेतीमाल निर्यात फसवणूकप्रकरणी अटक

Farmer Long March: ‘लाल वादळ’ नाशिकच्या वेशीवर

Farmers and Workers Protest: बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक

Tur MSP Procurement: हमीभावाने तूर खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता मर्यादा जाहीर

SCROLL FOR NEXT